गुरुपौर्णिमानिमित्ताने महर्षी व्यास मंदिरात भाविकांची गर्दी (व्हिडीओ)

guru

 

यावल प्रतिनिधी । गुरुपौर्णिमानिमित्ताने येथील प्रसिध्द महर्षी व्यास मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षी व्यास मंदिरात जिल्हयासह पंचक्रोशीतील भाविकांनी महर्षी व्यासांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लावली होती.

महर्षी व्यास मंदिरात 5 जोडप्यांच्या हस्ते ब्रम्हवृदांच्या मंत्रोच्चारात महर्षी व्यासांची महापुजा करण्यात आली. समितीच्यावतीने भात, रव्याच्या शि-यांचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आजू-बाजूच्या गावासह तालुक्यातून शिष्यगणांच्या पायी दिंडी घेऊन देखील भाविक आले आहेत. व्यास मंदिराची माहितीभारतातील एकमेव, साडे पाच हजार वर्षापुर्वीचे पुरातन महर्षी व्यासांच्या मंदिरावर आषाढ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भाविकांनी गर्दी पाहण्यास मिळते. सत्ययुग, त्रेतायुग, व्दापारयुग, कलियुग या पैकी तिसऱ्या व्दापारयुगामध्ये भगवान वेद महर्षी व्यासाचा हा विष्णूचा अवतार आहे. भगवान वेद महर्षी हे व्यास नगरीत आले कसे या ठिकाणी लोमेश नावाच्या ऋषींनी महाविष्णूचा यज्ञ करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे भगवान वेद महर्षी व्यास यांनी याठिकाणी पाचरण केले. आपल्या मंत्राद्वारे साक्षात अग्नी देवतेच्या द्वारे यज्ञाची सांगता केली. हा आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा दिवशी म्हणजेच त्याचा जन्म दिवशी आहे. यामुळे या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सम्पूर्ण जगाला जे वांग्मय अर्पण केले आहे.

त्यात १८ पुराणे, ४ उपपुराणे, ४ वेद, ४ शास्त्र, 108 उपनिषद, महाभारत, धर्मकारण, समाजकारण, राजकारण असे आहे. या व्यास पौर्णिमेला जग भरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच महिला-पुरुष मर्दुगाच्या व झांजच्या गजरात व्यासाचे अभंग म्हणून वारकरी पायी येत असून सर्व नगरी ही भक्तिमय झालेली दिसतात. महर्षींनी या जगाला जे अर्पण केले असे कुठलेही वांग्मय शिल्लक राहिलेले नाही कि त्या वेदांनी स्पर्श केलेली नाही. व्यास नगरीत भगवान गणेशाच्या हस्ते महाभारताच्या परवाची रचना केली गेली. तो दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा (गुरु पूजनेचा) पवित्र दिवस म्हणून साजरा करण्यात येते.

 

Protected Content