कोरोना जनजागृतीसाठी तिस हजार किलोमीटर सायकल प्रवास….

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी ।   सायकल भ्रमंतीने बांगलादेश ,भूतान, नेपाळ या तिन देशाची सायकल सफर करुन आलेले नितीन गणपत नारनोळकर यांनी कोरोना महामारीबद्दल जनजागृती करण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील गावात जाऊन अनोखी देश सेवा करत आहेत. ते चाळीसगाव येथे शनिवार ३ एप्रिल रोजी दाखल झाले  असता त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी अभिनंदनाचे पत्र प्रदान केले.

आंभोळी ता. चंदगड जि. कोल्हापूर येथील रहिवाशी नितीन गणपत नारनोळकर यांनी कोरोना महामारीबद्दल जनजागृती करण्यासाठी राज्यात सुमारे तीस हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचे संकल्प केला आहे.  या संकल्पनेतून त्यांनी लाखो लोकांना कोरोना काळामध्ये मास्क वापरा. सुरक्षित अंतर ठेवा. सेनीटायझर वापर करा याबाबत जनजागृती करून सामाजिक उपक्रम राबवित आहे.  नितिन यांनी सायकल फेरीतून अनोखी देश सेवा केलेली आहे.  नितीन नानोळकर  युवा सायकलपटूने या केलेल्या अभिनव उपक्रमास मी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. येणाऱ्या काळात नितीन नानोळकर यांच्याकडून आधिकाधिक समाज सेवा घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो. अशा शुभेच्छा नितीन नानोळकर यांचेशी दूरध्वनी वरून खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Protected Content