मनसेने साधला ठाकरे सरकारवर निशाणा

 

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉक डाऊनचा इशारा दिला आहे. मात्र, लॉक डाऊन लाऊ नये अशी मागणी विरोधकांनी लावली असून मनसेने ठकारे सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘१८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडनं लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत,’ असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाउन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. आता राज्य सरकारकडून शेवटचा प्रयत्न केला जाईल. मुंबईत लॉकडाउन लावण्याची सरकारची मानसिकता नाही. पण लोकांच्या जीवाचा प्रश्न असेल तर राज्य सरकारकडे दुसरा पर्याय नाही. अजून आम्ही लोकांना विनंती करत आहे. पुढचे दोन दिवस मार्केटमध्ये जाऊन निवेदन दिले जाईल. आम्हाला मजबूर करू नका, असे जनतेला आवाहन करणार असल्याचेही अस्लम शेख यांनी सांगितले.

 

 

Protected Content