राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा : अटकेची शक्यता

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आज औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगणे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार राज ठाकरे हे प्रथम क्रमाकांचे आरोपी आहेत. राज ठाकरेंसह सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान,  राज ठाकरे यांच्या विरोधात भादंवि कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ (अटी शर्तींचा भंग करणे); १५३ – दोन समूहात भांडण लावणे

११६  – गुन्हा करण्यासाठी मदत; ११७ – गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण आदी कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   औरंगाबाद पोलिसांनी सभेला परवानगी देताना ज्या अटी-शर्थी घातल्या होत्या त्यांचं उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!