आता आम्हाला कोणता पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही ! : दानवे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या कॉंग्रेस फुटीची चर्चा सुरू असली तरी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

सध्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपल्या समर्थक १२ आमदारांसह भाजपमध्ये सहभागी होण्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. याबाबत दानवे यांनी म्हटलं आहे की, आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला तयार आहोत असे सांगण्यास मात्र ते विसरले नाहीत.

दानवे पुढे म्हणाले की, आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. त्यांच्यामध्ये असंतोष असेल तरी त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

Protected Content