खामगावात घरोघरी महालक्ष्मीचे आगमन ; सर्वत्र उत्सवाचे वातावरण

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  भाद्रपद महिन्यात शुक्ल अष्टमीला महालक्ष्मी पूजन केले जाते. महालक्ष्मीचे आगमन गणेश चतुर्थीच्या चार दिवसांनी होते. यानुसार आज खामगावात देखील महालक्ष्मीचे  घरोघरी आगमन होत आहे.

 

कोल्हापूरवासिनी महालक्ष्मी माता मुलाबाळांसह तीन दिवसांसाठी माहेरी येतात. आज महालक्ष्मीची स्थापना, उद्या महापूजा आणि परवा विसर्जन असा तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल अष्टमीला महालक्ष्मी पूजन केले जाते. महालक्षमींचं आगमण गणेश चतुर्थीच्या चार दिवसांनी होतो. राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत.  हा सण साजरा करण्यामागी आख्यायिका आणि मान्यता देखील वेगवेगळ्या आहेत. काही मान्यतांनुसार गौरीला श्री गणेशाची बहीण मानले जाते, तर प्रचलित दंतकथांनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ती श्री गणेशाची माता आहे. काही लोक या सणाला महालक्ष्मी पूजा देखील म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करतात.भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर जेष्ठा गौरीचे आगमन होते.  त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करण्याची पद्धत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठागौरी होय. पण ती घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबवू तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो. महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबात शेकडो वर्षांपासून हा सण अखंडपणे साजरा होत आहे. एकंदरी मागील दोन वर्षानंतर सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे

 

Protected Content