मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढवणार

मुंबईः वृत्तसंस्था । मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केलीय.

देशात एका राज्याएवढं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले की आम्ही वॉर्डमध्ये १०० दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन आखलाय, वॉर्डनिहाय रिव्ह्यू करणार आणि एकटं लढण्याचा आमचा निर्णय ठाम आहे मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणीही या निमित्तानं काँग्रेसनं केलीय. मनपाच्या तिजोरीवर केवळ १६८ कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणं गरजेचं असल्याचंही मतही भाई जगतापांनी व्यक्त केलंय.

पाणी माफिया मोठ्या प्रमणात पाणीचोरी करतात, त्याऐवजी हे पाणी गरिबांना मिळायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरं नियमित करण्याच्या घोषणा केल्या, पण त्याचं पुढे काय झालं?, असा प्रश्नही भाई जगपातांनी उपस्थित केलाय. बाळासाहेब थोरातांना मुंबईबद्दल आदर आहे, मुंबई अध्यक्षाबद्दल हे आज ठरलेलं नाहीये. आमचे प्रभारी एच. के. पाटलांनी जे काही सांगितलं ते योग्यच असल्याचंही भाई जगतापांनी अधोरेखित केलंय.

“मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालतेय. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे २२७ जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्याच दिवशी सांगितला होता. मुंबई अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पुनर्ऊल्लेख केलाय होता, असंही भाई जगताप काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आम्ही प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करू, लोकांची काम करू, त्या कार्यकर्त्याला विचारू आणि त्यानंतर वरिष्ठांना २२७ जागा का लढायच्या हे सांगू,” असेही जगताप यांनी सांगितले होते. “भाजपबरोबर सेना सत्तेत असताना मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकितं करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत‌ नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला होता.

Protected Content