जिल्हा रूग्णालयात बंद्याच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन

जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या ५९ वर्षीय बंद्याचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज बुधवारी न्या. जी.जी.कांबळे यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा करण्यात आले.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सन-२०१७ अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात संशयित आरोपी रघुनाथ लोटू इंगळे (५९, रा. महावीर चौक, सावदा) यांच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. प्रकृती बिघडल्याने कारागृह प्रशासनाने त्याला १ जानेवारी रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. मणक्याच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केलेला आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूविषयी नातेवाईकांनी कोणताही आक्षेप किंवा तक्रार केलेली नाही. न्यायालयीन बंद्याचा मृत्यू झाल्यास कायद्यानुसार त्याचे न्यायाधीशांच्या उपस्थित ३० मिनीटे इनकॅमेरा शवविच्छेदन होते व तक्रार असल्यास सीआयडीमार्फत चौकशी केली जाते.

Protected Content