पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाचे मंदिर पुन्हा उभारण्याचे आदेश

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खैबर पख्तूनख्वामधील शेकडो वर्ष जुनं हिंदू मंदिर पुन्हा उभारण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यामध्ये या मंदिरावर काही समाजकंटकांनी हल्ला करुन त्याचं मोठं नुकसान केलं होतं.

पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद यांनी या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव खराब होत असल्याचा संदर्भ देत मंदिराच्या पुर्नबांधणीचे आदेश दिलेत. या पुर्नबांधणीसाठी आणि डागडुजीसाठी जो खर्च होणार आहे तो या मंदिराचं नुकसान करणाऱ्यांकडून घेण्यात यावाता असे आदेशही अधिकाऱ्यांना न्यायालायने दिले आहेत.

 

१०० वर्षांहून अधिक जुनं असणारं हे मंदिर खैबर पख्तूनख्वामधील करक जिल्ह्यातील टेरी गावामध्ये आहे. या मंदिरामध्ये एका हिंदू धर्मगुरुंची समाधी आहे. हिंदू समुदायातील काही लोकांनी येथील स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन या मंदिराच्या जीर्णोद्धाराची आणि डागडुजीची परवाणगी घेतली.

 

याचमुळे संतापलेल्या काही स्थानिक मौलवी आणि जमीयत उलेमा-ए-इस्लाम पार्टीच्या (फजल उर रहमान गट) समर्थकांच्या नेतृत्वाखाली समाजकंटकांनी मंदिराचे जुने बांधकाम पाडले. तसेच जीर्णोद्धाराचे जे काम सुरु होतं त्याचीही मोडतोड करुन मंदिराचं मोठं नुकसान केलं. त्यानंतर या मंदिराला आगही लावून देण्यात आली.

 

हिंदू मंदिरावरील या हल्ल्याची पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जगात चर्चा झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक अधिकाऱ्यांना मंगळवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाने एवेक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डाला मंदिराच्या पुर्नबांधणीचं काम सुरु करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबरच न्यायालयाने देशातील सर्व मंदिरे, तसेच गुरुद्वारांसंदर्भातील माहिती देण्यासंदर्भातील सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

केवळ प्रार्थाना होत असणाऱ्याच नाही तर पुरातन आणि इतर फारसे भाविक जात नसणाऱ्या धार्मिक स्थळांचीही महितीही सर्वोच्च न्यायालायने मागवली आहे.

 

एवेक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्ड हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर भारतामध्ये आलेल्या हिंदू आणि शीख लोकांच्या मालकीच्या संपत्तीची देखभाल आणि त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचं काम या बोर्डाच्या माध्यमातून केलं जातं. पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधिशांनी ईपीटीबीला देशभरातील मंदिर परिसरामधील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिलेत.

मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद यांनी ईपीटीबीला मंदिराची डागडुजी आणि पुर्नबांधणीसाठी लागणारी रक्कम ही मंदिरावर हल्ला करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन आणि चिथवणी देणारा प्रमुख संशयित आरोपी मौलवी मोहम्मद शरीफ यांच्याकडून घेण्याचे आदेश दिलेत.

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा आमदार राहिलेले हिंदू नेते रमेश कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. या हिंदू मंदिराची १९९७ सालीही मोठी पडझड झाल्याची माहिती कुमार यांनी आपल्या याचिकेत दिली आहे.

.

खैबर पख्तूनख्वामधील करक जिल्ह्यातील टेरी गावातील मंदिराला आग लावल्यानंतर तिथे जमलेल्या जमावातील अनेकांनी मंदिरातील महागड्या वस्तू चोरल्याचाही दावा केला जात आहे.

पोलिसांसमोर या मंदिरामधील सामान चोरली गेलं तरी त्यांना कोणावरही काहीही कारवाई केली नाही असा आरोपही केला जात आहे.

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी लवकरच सरकारकडून या मंदिराची आणि येथील समाधीची पुर्नबांधणी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी मुस्लीमांनीही मोर्चांमध्ये सहभाग घेतल्याचे पहायला मिळालं.

 

Protected Content