केसीई आयएमआरच्या विद्यार्थ्यांना उत्तुंग प्लेसमेंटच्या माध्यमातून अमेरिकेतही मिळणार संधी

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या आयएमआर मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून देशातील नामाकिंत कंपन्यासह विदेशातही संधी मिळाली आहे. ज्यात प्रामुख्याने सौरभ काबरा, मुकेश पाटील, अविनाश पाटील आणि सत्यम पाटील ह्यांना लीड बीबी ग्लोबल प्रा. लिमिटेड ह्या कंपनीतर्फे नियुक्त करण्यात आले आहे.

आयएमआर मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्यात. ज्यांना भविष्यात अमेरिकेत देखील पाठविण्यात येईल. यात किशोर काकडे हा कोटक महिंद्र बैंकेत, अक्षय सोनवणे हा अपोलो म्युनिच हेल्थकेअर मध्ये, सुवर्णा पाटील एचडीबी फिनान्शियल सर्व्हीसेस मध्ये, कल्पेश वाघ हा भारत फिनान्शियल इन्क्लुडींग लिमिटेड मध्ये तसेच आकाश पडोळ हा चोला एमएस बँकेत, शंकर मोरे, उमेश कुमावत आणि विशाल खर्चे हे विवो मोबाईल मध्ये, मानसी अग्रवाल आणि रिया थरानी ह्या विविधता कन्सल्टिंगमध्ये तर सोनू काझी हा टीसीएसमध्ये असे अनेक विद्यार्थी नियुक्त झाले आहेत.

ह्याशिवाय आयएमआर ने बैंगलोर येथील ग्रेट लर्निंग अकादमी आणि टाटा समूहाच्या स्ट्राईव्ह सोबत करार केला आहे, ज्यात अंतर्गत एमबीएचे एकूण ३२ तर एमसीए विभागाचे १२ विद्यार्थी जागतिक पातळीची ट्रेनिंग घेत आहेत. इन्स्टिट्यूटने ह्यावर्षी अनेक मान्यवरांतर्फे प्लेसमेंट वर आधारित कार्यशाळा घेतली ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला आणि त्यांना उत्तम नोकरीच्या संधी मिळाल्या. यावेळी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी कौतुक केले तर ट्रेनिंग एंड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content