सरकारी अधिकाऱ्यांकडे सापडले मोठे घबाड; ३५ ठिकाणी टाकले छापे

बंगळूरू- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बंगळुरू आणि रामनगर जिल्ह्यांतील ६ सरकारी अधिकार्‍यांवर बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटक लोकायुक्तांनी यांनी तब्बल ३५ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अधिकाऱ्यांनी तब्बल ५१ कोटी १३ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे समोर आले आहे. लोकायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सदस्य एच. एस. सुरेश यांच्याकडे २५ कोटी ५८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आहे. या छापेमारीमुळं कर्नाटकातील अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सकाळी सहा अधिकाऱ्यांच्या 35 ठिकाणी छापे टाकले. बेसकॉमच्या मुख्य कार्यालयावर मुख्य महाव्यवस्थापक (ओपी) एमएल नागराज, देवनहल्ली तालुका पंचायत विकास अधिकारी डीएम पद्मनाभ, पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता एन सतीश बाबू, केआरआयडीएलचे एईई सय्यद मुनीर अहमद, ग्रामपंचायत सदस्य एच एस सुरेश, नियोजन प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि नगर नियोजन विभागाचे सहसंचालक मंजेश अनिकल यांच्याशी संबंधित मालमत्तावर छापो टाकल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलीय. लोकायुक्त अधिकार्‍यांनी ज्या अधिकार्‍यांच्या जागेवर छापा टाकला त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

ग्रामपंचायत सदस्य सुरेशच्या मालमत्तेत १६ भूखंड, एक घर, ७.६ एकर शेतजमीन, ११.९७ लाख रुपये रोख, २.११ कोटी रुपयांचे दागिने, २.०७ कोटी रुपयांची वाहने यांचा समावेश आहे. तर केआर सर्कल, बंगळुरु येथील बेसकॉमच्या मुख्य कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक एम. एल. नागराज यांच्या मालकीच्या ७ ठिकाणी छापोमारी करण्यात आली. यात अंदाजे ५.३५ कोटी रुपयांचे १३ भूखंड, २ घरे, शेतजमीन, ६.७७ लाख रुपयांची वारसाहक्क, १६.४४ लाख रुपयांची रोकड, १३.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ६३.६६ लाख रुपयांच्या घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.

Protected Content