लोखंडी रॉडने तरूणाला बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी ९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता मारहाण करणारे तीन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे अजय जंगलू चव्हाण वय २९ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणारे मंगल जंगलू चव्हाण, जंगलू शहादू चव्हाण आणि छाया जंगलू चव्हाण यांनी पकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली या मारहाणीत अजय चव्हाण याच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अजय चव्हाण याने मंगळवारी ९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे मंगल जंगलू चव्हाण, जंगलू शहादू चव्हाण आणि छाया जंगलू चव्हाण सर्व रा. पारधीवाडा, हनूमान नगर, धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.

Protected Content