वसंतवाडी शिवारातील शेतातून १० शेतकऱ्यांच्या केबल वायरची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथील दहा शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी केबल वायर व स्टाटर्स असा एकून १८ हजार ८५० रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरून नेल्याचे आज उघड झाले आहे. याप्रकणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी सुपडू काळू पाटील (वय-७०, रा. वसंतवाडी ता.जि.जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वसंतवाडी शेत शिवारात शिवाजी गोलू पाटील, भागवत भास्कर पाटील, प्रविण रामदास पाटील, रमेश यशवंत पाटील, काशिनाथ रतन जाधव, जगराम शंकर चव्हाण, नंदीनी आत्मराम पाटील, पंडीत चिंधू पाटील, बेबाबाई विश्वनाथ पाटील आणि पंडीत तोताराम राखोंडे सर्व रा. वसंतवाडी ता.जि. जळगाव यांच्या शेतात असलेले केबलच्या वायरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. यात ईलक्ट्रिक केबल वायर आणि विद्यूत पंपाचे स्टाटर्स असा एकुण १८ हजार ८५० रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरीला गेला आहे. शेतकरी सुपडू पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवदास चौधरी करीत आहे.

Protected Content