विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे गेट परिक्षेत यश

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्‍थेतील बी.टेक. अंतिम वर्षातील ८ विद्यार्थ्यांनी गेट परीक्षेत यश संपादन केले आहे.

खरगपूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थान यांनी गेट-२०२२ या परीक्षेचे आयोजन केले होते. विद्यापीठाच्या बी.टेक. अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या निखील पाटील, स्वप्नील पाटील, संदेश कलंत्री, कृष्णा मुळे, वरद नेरकर, सुयोग गाढवे, प्रतिल झोडे आणि चैताली बारमासे या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केली. या विद्यार्थ्यांचा कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक प्रा.जे.बी.नाईक, गेट परीक्षा तयारीसाठीचे समन्वयक डॉ. तुषार देशपांडे, डॉ.राजकुमार सिरसाम, डॉ.महेंद्र बारी, डॉ.जितेंद्र नारखेडे, डॉ.रवींद्र पुरी, डॉ.उज्वल पाटील आदी उपस्थित होते. आय.आय.टी. व एन.आय.टी. मधील अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तसेच भारत सरकारच्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी प्राप्त करणेसाठी गेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!