बालभारतीच्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त

 

 

पुणे- : वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने (बालभारती) अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी सदस्यांना पाठवले आहे.

विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना करण्यात आली होती. बालभारतीच्या प्रचलित पद्धतीत बदल करून अभ्यास मंडळ हे नाव बदलून विषय समिती आणि अभ्यास गट असे करण्यात आले. या समित्या आणि अभ्यास गट भाजप सरकारच्या काळात तयार करण्यात आले होते.

दरम्यान त्याजागी नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. सत्तेतील तीन पक्षांशी संबंधित व्यक्तींची नव्या विषय समित्या आणि अभ्यास गटांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Protected Content