बंद पडलेल्या अनुदानित दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्याची माहिती अपलोड करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी ।  बंद पडलेल्या अनुदानित दिव्यांग विशेष शाळेतील मान्यताप्राप्त कर्मचाऱ्‍यांची माहिती 31 मार्चपूर्वी अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील  30 जून, 2020 पर्यंत बंद पडलेल्या/ रद्द केलेल्या दिव्यांगाच्या अनुदानित विशेषशाळा / कार्यशाळा मधील मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी यांचे नावे आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीत सामाविष्ठ करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्तालयाचे  Google forms  मध्ये  http://bit.ly/Absorptionapplication  अशी लिक तयार करुन कार्यान्वित करण्यात आली असून त्याव्दारे संबधित मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवश्यक त्या प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती अपलोड करुन माहिती 31 मार्च, 2021 पर्यंत भरण्यात यावी.

सदर दिनांकापर्यंत संपूर्ण माहिती प्रमाणित कागदपत्रांसह परिपूर्ण माहिती उपरोक्त लिंकमध्ये न भरल्यास संबधित समायोजनबाबत कार्यवाही करणे शक्य होणार नाही. तसेच समायोजनासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तात्काळ कार्यालयास सादर करावे. याची नोंद जिल्हयातील बंद पडलेल्या / रद्द केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घ्यावी. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यानी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content