यावल तालुक्यात कोरोना रूग्ण शोध मोहीमेस सुरूवात (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावल तालुक्यात होम टू होम नागरीकांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी तालुका प्रशासनाने मंगळवारी २३ मार्च रोजी तातडीची बैठक घेतली. 

तालुक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तहसीलदार आर.डी.पाटील. निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी महसुल प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपरिषद आणि शिक्षण विभागा यांच्याशी बैठक घेवून  कोरोना विषाणु संसर्गा बाबत चर्चा केली. 

यावल तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची वाढती संख्याही प्रशासना करिता चिंतेचा विषय बनले असून शासन पातळीवर कोरोना संक्रमणाचे उच्चाटंन गाठण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन गावनिहाय व शहरी क्षेत्रातील होम टु होम प्रत्येक नागरीकांच्या आरोग्याची तपासणीची मोहीम आजपासुन सुरू करण्यात आली आहे.  यासाठी ग्रामीण पातळीवर शिक्षक, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी यांचे  संयुक्तगट’ या आरोग्य तपासणी मोहीमेत सहभागी झाले आहे.  प्रतिदिन सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात  कोरोना रुग्णांच्या तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

याबैठकीला प्रभारी तहसीलदार रविंद्र पाटील, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, यावल मुख्याधिकारी बबन तडवी, फैजपुर नगरपरिषद मुख्यधिकारी किशोर चव्हाण, यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ .बी बी बारेला, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी एन.के. शेख, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, पं.स.चे प्रशासन अधिकारी जी.एम. रीढे, फैजपुरचे करनिरीक्षक बाजीराव नवले, गट समन्यवयक प्रमोद रामा कोळी, एस.के.शेख, सुभाष तायडे, न्हावीच्या केन्द्र प्रमुख जयप्रभा बोरोले, दहीगाव केन्द्र प्रमुख विजय ठाकुर, किनगावचे केन्द्र प्रमुख प्रमोद सोनार, अंजाळे जि.प. शाळा मुख्यध्यापक मनोहर चौधरी आदींनी या सहभाग घेतला.

https://www.facebook.com/508992935887325/videos/201801087947327

 

Protected Content