Home आरोग्य देशातील सर्वाधिक १० कोरोनाग्रस्त शहरांमध्ये जळगावंही !!!

देशातील सर्वाधिक १० कोरोनाग्रस्त शहरांमध्ये जळगावंही !!!

0
44


 

मुंबई : वृत्तसंस्था । देशातील सर्वाधिक १० कोरोनाग्रस्त शहरांमध्ये जळगावंचाही  समावेश असल्याचे आज स्पष्ट झाले आहे

 

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही महराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत

 

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे – पुणे , नागपूर, मुंबई , ठाणे , नाशिक , औरंगाबाद , नांदेड , जळगाव , अकोला


Protected Content

Play sound