शिक्षण शास्त्र महाविद्यालयातर्फे महामानवाला अभिवादन

educational department

जळगाव प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रा.संदीप केदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर. राणे, प्रा.प्रवीण कोल्हे, वंदना चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करीत महामानवाला अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. बाबासाहेबांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, असे मत प्रा.संदीप केदार यांनी व्यक्त केले. के.सी.ई. सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी व्यक्त केले.

यावेळी मंचावर एन. एस. एस विभागाच्या प्रमुख वंदना चौधरी, अध्यक्षस्थानी डॉ.ए.आर. राणे प्रमुख पाहुणे प्रा. संदीप केदार तसेच प्रा. प्रवीण कोल्हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.ए.आर. राणे यांनी सांगितले कि, थोर समाजसुधारक यांचे विचार वर्षानुवर्ष आजही समाजात चिरंतन टिकून आहे, चांगल्या विचारांचा दिवा चिरंतन तेवत ठेवल्याने आज हे विचाराने समाज परिवर्तन घडवून आणले आहे. तसेच भविष्यातही घडतील मानवाने भौतिक सुखाचा विचार बाजूला ठेवून वैचारिक जिवंतपणा अंगीकारला तर समाजात काही प्रमाणात का होईना चांगले कार्य घडेल तसे झाल्यास हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली राहील असे मत यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक प्रा. प्रवीण कोल्हे तर आभार वंदना चौधरी यांनी मानले. प्रा. के.जी बाविस्कर यांनीही मोलाचे विचार मांडले. यावेळी रोशन आरा, शुभांगी सोनवणे, दिपाली गायकवाड, संजय पावरा या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच जनसंवाद व पत्रकारिता विभागातर्फे प्रा. केतकी सोनार, अभय सोनवणे, संजय जुमनाके आदी उपस्थित होते.

Protected Content