बोदवड कृषी विभागात शेतकरी दिनानिमित्ताने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील  कृषी व पंचायत समिती कार्यालयामार्फत शेतकरी दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले.

 

आज गुरुवार दि. ११ ऑगस्ट अर्थात शेतकरी दिनानिमित्ताने बोदवड कृषी विभागात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका कृषी अधिकारी सी.जे.पाडवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करण्यात आले. याप्रसंगी  पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रदिप धांडे,  विस्तार अधिकारी एकनाथ चौधरी, नुतन लांडगे मंडळ व श्री. दिपके. वडजे  कृषी  पर्यवेक्षक भोसले, बीटीएम पंकज माळी,शिवाजी मोरे यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्यबद्दल माहिती देण्यात आली.  आपल्या  जलसंधारण, सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला. जनतेच्या समस्या सोडवतांना गोरगरीब जनतेस कशाप्रकारे न्याय मिळवून दिला. याबाबतचे माहिती  तालुका कृषी अधिकारी पाडवी यांनी दिली. आम्ही पण सर्व सहकारी प्रयत्नशील राहू असे अभिवचन यावेळी त्यांनी इतरांना दिले. सूत्रसंचालन पंचायत समितीचे प्रदिप धांडे यांनी केले तर (आत्मा )चे  पंकज माळी यांनी  आभार मानले

 

Protected Content