चिमणआबा म्हणतात, ‘दुसर्‍या टप्प्यात तरी नंबर लागणार !’

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिंदे गटातील मंत्रीमंडळाच्या पहिल्या विस्तारात क्रमांक न लागलेले आमदार चिमणराव पाटील यांना पुढील टप्प्यात  तरी आपला क्रमांक लागणार असल्याची आस लागली आहे.

 

मंत्रीमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार दोन दिवसांपूर्वीच पार पडला. यात जळगाव जिल्ह्यातून माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यात जिल्ह्यातून फक्त त्यांनाच मंत्रीपद मिळाले. मात्र शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील यांना आपल्याला दुसर्‍या विस्तारात स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, मंत्रीपदाची अपेक्षा बाळगण्यात काहीही गैर नाही. पहिल्या विस्तारात आपला क्रमांक लागला नसला तरी दुसर्‍या टप्प्यात आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असल्याचे आमदार पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.

 

Protected Content