आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार : पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार

ELGEEVaUEAA553z

हैदराबाद (वृत्तसंस्था) आरोपींनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरील पोलिसांनी आरोपींना चेतावनी दिली. मात्र, त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला. आरोपींच्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले आहेत. मानवाधिकार आयोग किंवा अन्य कोणत्याही संघटनांच्या चौकशी, प्रश्नांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

 

आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेवर अत्याचार करतानाच आरोपींनी तिचा मोबाईल आणि इतर सामान लपवून ठेवले होते. तेच परत मिळवण्यासाठी आरोपींना पुन्हा एकदा घटनास्थळी नेण्यात आले होते. यावेळी, १० पोलीस आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले तर उरलेले गाडीतच बसलेले होते. यावेळी आरोपींनी अचानक पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवणार असल्याचे यावेळी सज्जनार यांनी सांगितले.

Protected Content