आधार व मोबाईल क्रमांक लिंकिंग न केल्यास धान्य मिळणार नाही – ब्राम्हणकर

पाचोरा प्रतिनिधी । सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधा प्रञिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर लिंक १०० टक्के पुर्ण करण्याचा सुचना केंन्द्र सरकार कडून प्राप्त झाल्या आहेत. अन्यथा, धान्य मिळणार नाही. अशा सुचना पुरवठा तपासणी अधिकारी दिपाली ब्राम्हणकर याच्यांकडून देण्यात आल्या आहेत.

या सुचनेच्या आधारावर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचा आदेशानुसार पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांची तहसील कार्यालय पाचोरा येथे मिटिंग घेण्यात आली. या मिटिंगमध्ये  तालुक्यातील लाभार्थ्यांची येत्या ३१ जानेवारी पर्यंत आधार व मोबाईल नंबर लिंक करूण घ्यावेत अशा सुचना दुकानदारांना देण्यात आल्या व  पाचोरा तालुक्यातील लाभार्थ्यांनी सुध्दा आपले आधार व मोबाईल नंबर लिंक करूण घ्यावे. अन्यथा लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळणार नाही. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक उमेश शिर्के, पुरवठा तपासणी अधिकारी दिपाली ब्राम्हणकर, अव्वल कारकून अजिंक्य आंधळे, उमेश पुरी, शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

 

Protected Content