जळगाव बसआगारातून सुटल्या परप्रांतियांसाठी सिमेपर्यंत बसेस

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईकडून शेकडो प्रवासी आपापल्या राज्यात पायी प्रवास करत निघालेले असतांना जळगावपर्यंत जवळजवळ ४०० किलोमीटर प्रवास पायी केला. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या सुचनेनुसार जळगाव बसआगारतर्फे या मजूरांना मध्यप्रदेश व छत्तीसगड सिमेपर्यंत पोहचविले जात आहे.

आज प्रथम दिवशी आगारातर्फे सात ते आठ बसेस सायंकाळच्या ५ वाजेपर्यंत परप्रातीयांना घेवून रवाना झाले. आगार व्यवस्थापक श्री. बोरसे यांनी सांगितले की, जसे जसे मजूरांची संख्या वाढेल त्यानुसार मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. जाणाऱ्या सर्व बसेस सॅनिटाईज केले असून काही प्रवाश्यांना मास्क देण्यात आले. तसेच सेवाभावी संस्थेतर्फे नास्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याकामी आम्ही आगाराचे विशेष पथक तैनात केली आहे. दरम्यान बसमध्ये बसलेल्या प्रवाश्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/783816858816449/

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3094607847245629/

Protected Content