जळगावातील दालमिल व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक; एमआयडीसीत गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील दालमिल व्यापाऱ्याची १९ लाख ७८ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरत येथील एका दुकानदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रमेशचंद तेजराज जाजु (वय-६३) रा. गणपती नगर जळगाव हे व्यापारी आहे. त्यांची आर.सी.फुड इंडीया प्रायव्हेट लिमिटेड  नावाची कंपनी एमआयडीसी सेक्टरमध्ये आहे. रमेशचंद जाजु हे व्यापारी असल्यामुळे त्यांचे जिल्हा व राज्याबाहेर चनादाळ आणि तुरदाळ विक्री करतात. खरेदी विक्रीचा व्यवहार हा ऑनलाईन होत असतात. सुरत येथील मुकेश देवशीभाई कथारोटीया रा. वराछा बँकेच्या पुढे सुदामा चौक, सुरत यांचे ट्रडींग दुकान आहे. त्यांच्याशी तुर व चनादाळ व्यापाऱ्याकरीता ऑनलाईन व्यवहार २७ डिसेंबर २०२० झाला. त्यानंतर वेळोवेळी व्यवहार करून ठरलेली रक्कम पाठवित होते. रमेशचंद तेजराज जाजु यांनी १९ लाख ७८ हजार ५४० रूपयांचा चना व तुरदाळ त्यांना पाठविली. मात्र मुकेश कथारोटीया यांनी पैसे पाठविले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेशचंद जाजु यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून मुकेश कथारोटीया यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Protected Content