रायसोनीत जीएसटीवर कार्यशाळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील जी.एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जी.एस.टी अभ्यासक्रमावर दोन दिवशीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर, सी.ए. अनिल शाह, विद्यापीठ विद्या परिषद सदस्या सी.ए.पल्लवी मयूर, संचालिका डॉ.प्रीती अग्रवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, प्रा.रफिक शेख, डॉ.दीपक शर्मा, सी. एस. प्रा. राज कांकरिया उपस्थित होते. विद्यार्थ्यांना नोकरीसाठी या अभ्यासक्रमाचा फायदा होईल, असे मत प्र-कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर यांनी व्यक्त केले. जी.एस.टी.कायद्यातील बदल व संकल्पना सी.ए.अनिल शाह, सी.ए.पल्लवी मयूर, सी.ए.दर्शन जैन यांनी स्पष्ट केली. प्रा. कांकरिया यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विद्यापीठांतर्गत येणार्‍या विविध महाविद्यालयांतील शिक्षक तसेच विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

Add Comment

Protected Content