कारण नसतांना विवाहितेला मारहाण करून छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेस्कोमाता नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला कारण नसतांना मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ ऑक्टाबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेस्को माता नगरातील माहेर असलेल्या आरती सिध्दार्थ बिऱ्हाडे (वय-३०) यांचा विवाह आसोदा येथील सिध्दार्थ भास्कर बिऱ्हाडे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतरचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला काहीही कारण नसतांना पती सिध्दार्थ बिऱ्हाडे याच्याकडून मारहाण करण्यात आली. तसेच नणंद, भासा यांनी देखील त्रास देवून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.

मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सिध्दार्थ भास्कर बिऱ्हाडे, नणंद नवाबाई अरूण सुरवाडे आणि भासा गणेश अरूण सुरवाडे सर्व रा. आसोदा ता.जळगाव  यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ योगेश माळी करीत आहे.

 

Protected Content