चंद्रकांतदादा राजकारणातून सन्यास घेत हिमालयात जाणार का ? – खडसे आणि मिटकरींचा खोचक टोला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी “कोल्हापूरच्या निवडणुकीत पराभव झाला तर मी या ठिकाणी पराभव झाला तर राजकारणातून सन्यास घेत मी हिमालयात जाईल” अशी प्रतिज्ञा केली होती. याठिकाणी कॉंग्रेसचा विजय झाल्याने चंद्रकांतदादा राजकारणातून संन्यास घेत हिमालयात जाणार का ? असा प्रश्न सर्व सामन्यांना पडला असतांना एकनाथराव खडसे आणि अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.

कोल्हापूर येथील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव करून कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय संपादन केला आहे. या विजयाचा जळगाव शहरात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आज आनंदोत्सव साजरा केला तर एकनाथ खडसे आणि अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “चंद्रकांतदादांनी हिमालयात जायचा शब्द फिरवला.” असा टोला खडसेंनी लगावलाय तर “परभवाची जबाबदारी स्वीकारून चंद्रकांतदादांनी हिमालयात जावं.” असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

कोल्हापुरात पराभव झाला तर हिमालयात जाईल अशी प्रतिज्ञा दादांनी केली आणि निवडणुकीचे निकाल लागल्यावर दादाने तात्काळ शब्द फिरवला भाजपचे प्रदेश अध्यक्षाने जनतेला दिलेला शब्द इतक्या लवकर फिरवण याचं आश्चर्य वाटतं असे खडके यांनी यावर व्यक्त होतांना सांगितलं

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या धनुष्य हा महाविकास आघाडीच्या जरा कामात आला तसा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची गदासुद्धा महाविकास आघाडीच्या हातात आली. कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांच्या कृपेने हि गदा भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात मारली. भारतीय जनता पार्टीचा याठिकाणी पराभवच आला. चंद्रकांत पाटलांनी दिलेला शब्द पाळावा. तारीख सांगावी मी मी सुध्दा त्यांचे सोबत टाळ घेऊन सोडायला येईल. असा खोचक टोला मिटकरी यांनी मारला.

Protected Content