संत गाडगेबाबा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत “डेबूजी वोरीयर्स” संघ विजेता

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील सागर पार्क मैदानावर दि. १२ ते १४ एप्रिल दरम्यान संत गाडगेबाबा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा खेळली गेली. स्पर्धेच्या अंतिम दिवशी “गाडगे बॉईज” आणि “डेबूजी वोरीयर्स” यांच्यात झालेल्या सामन्यात डेबूजी वोरीयर्स संघाने विजेतेपद पटकावले.

 

संत गाडगेबाबा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष अरुण शिरसाळे, जि.प.सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, कलाबाई शिरसाळे, सुरेश ठाकरे, नितीन सपके, रितेश निकम, पंकज शिरसाळे, राजू सोनवणे, नरेंद्र जाधव, गणेश बच्छाव, प्रभाकर खर्चे, संदीप सुरळकर, अरुण सपकाळे, सुखदेव सोनवणे, आशुतोष पाटील, संदीप सोनवणे, बाळकृष्ण सोनवणे, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

सुरुवातीला सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडू व संघाना गौरविण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर हे तिन्ही पुरस्कार धोबी पछाड मेहरूण संघाचा खेळाडू पंकज सोनवणे याने पटकावले. तर उत्कृष्ट यष्टिरक्षक अविनाश देवरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विशाल परदेशी तर फेअर प्ले अवार्ड जय गाडगे चँपियन संघाने पटकावला. सर्व विजेत्यांना मान्यवरांनी गौरविले.

तसेच स्पर्धेत तृतीय विजेता संघ धोबी पछाड मेहरूण, द्वितीय विजेते पद गाडगे बॉईज संघांसह विजेते पद डेबूजी वोरीयर्स संघाला मान्यवरांनी चषक देऊन गौरविले. यावेळी विजेत्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. स्पर्धेच्या आयोजनासाठी तिन्ही दिवस दिलीप शेवाळे, अरुण शिरसाळे, चेतन शिरसाळे, संदीप सोनवणे, अविनाश देवरे, प्रविण आढाव, यशवंत सपकाळे, गणेश सुरसे, पिंटु बेडीस्कर, दिपक बाविस्कर, संतोष बेडीस्कर आदिंनी परिश्रम घेतले.

Protected Content