भोंगे काढा असं कुठे लिहलंय ? – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । “मशिदीवरील भोंगे काढा असं कुठे लिहलंय ?” असा प्रश्न करत “न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही तर रात्री 10 ते सकाळीं 6 लावू नये असं लिहिलेलं असल्याचं मुंबईत पत्रकारांशी बोलतांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

याप्रसंगी पाटील यांनी “उगाचच सामाजिक तेढ निर्माण न करता ज्यांना जी प्रार्थना करायची आहे ती घरात किंवा मंदिरात करावी. असे आवाहन करत भाजपने केवळ धार्मिक भावना पूढे करून प्रचार केल्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलं असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

पुढे बोलतांना त्यांनी आम्हाला कोल्हापूरचा विजय अपेक्षित तर होताच पण याहून आणखी मोठ्या विजयाची अपेक्षा होती असे होता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

Protected Content