जुने भांडण उकरून काढत तरुणाला बेदम मारहाण

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील खंडेराव नगरात जुने भांडण उकरून काढत तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षल गोपाल बारी २३ वर्षीय तरुण खंडेराव नगरातील राहतो. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता त्याला मागील भांडणाच्या कारणावरुन योगेश हरीलाल सोनार व निलेश हरिलाल सोनार या दोघ भावंडांनी चापटासह बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या हर्षलचा मित्र राहूल लक्ष्मण सुतार यालाही दोघा भावंडांनी मारहाण केली.

या मारहाणीत हर्षलच्या डोक्यास दुखापत झाली असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी हर्षच्या तक्रारीवरुन योगेश सोनार व निलेश सोनार या दोघा भावंडांविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपास कालसिंग बारेला हे करीत आहेत.

Protected Content