मोबाईल दुकानदाराची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तायडे गल्लीतून मोबाईल दुकानदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. शोध घेवून दुचाकी मिळाली नसल्याने अखेर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भगवानदास गोपीचंद वाधवानी वय ४१ रा. सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोबाईलचे दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. १० फेब्रवारी रोजी सकाळी ११ वाजता ते दुचाकीने गोलाणी मार्केटजवळील तायडे गल्लीत आले.

त्याच ठिकाणी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली व दुकानावर निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्कींग लावलेली दुचाकी चोरून नेली. रात्री ९ वाजता ते घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले तेव्हा त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यानंतर दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून दुचाकीचोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे हे करीत आहे.

Protected Content