मनवेल येथील वृध्दाने उचलले टोकाचे पाऊल !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील ६५ वर्षीय वयोवृद्धाने शेतात लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यंशवत काशीनाथ इंधाटे (वय-६५) रा. मनवेल ता. यावल असे मृत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत काशीनाथ इंधाटे या वयोवृद्ध इसमाने मनवेल शिवारातील प्रविण पाटील यांचा शेतातील बांधावरील निंबाचे झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . या घटनेची खबर बुद्धभुषण मंगल इंधाटे याने दिलेवरून यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या खबर वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयता यशवंत इंधाटेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण राग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी केले. मयताचे पश्चात पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Protected Content