भगीरथ कॉलनीतून तरूणाचा लॅपटॉप लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळीनिमित्त बहिणीकडे गेलेल्या तरूणाचा २० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप त्याच्या भाड्याच्या खोलीतून चोरट्याने लांबविल्याची घटना भगीरथ समोर आली आले. ही घटना भगीरथ कॉलनी येथे घडली असून याप्रकरणी गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील रहिवाशी नील सुरेश बोथरा हा सीए परीक्षेची तयारी करित आहे. त्यामुळे तो शहरातील भगीरथ कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये इतर मित्रांसह भाड्याने राहतो. दिवाळीनिमित्त नील हा शहरातच राहणाऱ्या बहिणीकडे ३० ऑक्टोंबरला गेला होता. १ नोव्हेंबरला खोलीतील मित्राचा फोन आला. त्याने माझी बॅग मिळत नसून मला परीक्षेला जायचे आहे म्हणून तुझी बॅग दे म्हणाला. त्यामुळे नील हा १२.१५ वाजता भाड्याच्या खोलीवर आला. तेव्हा त्याला त्याचा लॅपटॉप दिसून आला नाही. इतरांना विचारपूस केली. आजू-बाजूला लॅपटॉपचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर गुरूवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नील याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लॅपटॉप चोरीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

Protected Content