धानोरा येथील १३२ के.व्ही सबस्टेशनचे काम लवकर सुरू करण्याची मागणी

फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विद्युत यंत्रणा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही आहे, त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी नेहमीच अडचणी येत असून धानोरा येथील १३२ के.व्ही सबस्टेशनचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी अमोल जावळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, या परिसरात १३२ के. व्ही सबस्टेशनची कमी असल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होतो. त्यामुळे ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर आहे. शेतीच्या हंगामात वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे १३२ के. व्ही सबस्टेशन मंजूर असून सबस्टेशनचे काम सुरू झालेले नाही. सबस्टेशनचे काम सुरु झाल्यास शेतकऱ्यांना नियमित व उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता प्रशासनाला सुचना देऊन लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे अमोल हरिभाऊ जावळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मुंबईचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व मुख्य अभियंता यांना केली आहे.

Protected Content