मंगळवारी सावदा येथे सीएए व सीएबी समर्थनात आभार मोर्चा

10cab support1

सावदा, प्रतिनिधी | येथे राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे उद्या मंगळवार २४ डिसेंबर रोजी सीएए व सीएबी समर्थनात आभार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात  नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दुर्गा माता मंदिर येथून पोलीस स्टेशन पर्यत राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे सीएए व सीएबी समर्थनात नागरीकांचा भव्य आभार मोर्चा मंगळवार २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता निघणार आहे. तरी नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने सहपरिवार मोर्चात सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content