राष्ट्रीय दलित पँथरतर्फे कोरोना योद्धयांचा सत्कार

भुसावळ, प्रतीनिधी । देशात व राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यात सर्वच जण या महामारीच्या प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. अशाच प्रकारे आपली सेवा बजावत आहेत कोरोना योद्धयांचा सत्कार राष्ट्रीय दलित पँथरतर्फे करण्यात आला.

राष्ट्रीय दलित पँथर यांच्यातर्फे राज्य राखीव पोलीस दल डॉक्टर व सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या तीन महिन्यापासून आपला घरसंसार सोडून जनतेची सेवा देत आहेत. यात राज्य पोलीस दलाचे पोलिस निरीक्षक पठाण व डॉ. इजाज खान यांच्या यांचा सत्कार राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हाप्रमुख सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, युवा जिल्हा उपप्रमुख अलकेश मोरे, उपाध्यक्ष सुनील मुळे, कामगार नेते अरुणभाई दामोदर, रमाकांत वाघ आदी उपस्थित होते.

Protected Content