नशिराबाद नगरपंचायतीत अनु.जातीसाठी एकमेव ७-अ प्रभाग आरक्षित

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज, प्रतिनिधी | जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि नव्यानेच स्थापन झालेली नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यात नशिराबाद नगर पंचायतीसाठी केवळ ७ अ प्रभाग अनुसूचित जाती महिला तर अन्य १९ ठिकाणी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

जिल्ह्यात २०१९ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान नशिराबाद ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली होती. परंतु नशिराबाद हे लोकसंखेच्या मानाने विचार करता नगरपंचायतीत रुपांतर करावे अशी मागणी आणि ठराव देखील झाला होता. तरी देखील ग्राम पंचायत निवडणूक जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परन्तु शासनाने ग्रा. पं. निवडणूक काळातच नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्यात येत असल्याचे जाहीर होऊन ग्राम पंचायत निवडणूक स्थगित करण्यात आली होती.
दरम्यान संसर्ग प्रादुर्भावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर डिसेंबर २०२१ दरम्यान देखील निवडणुका साठी अधिसूचना काढण्यात आली होती, परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत असा राज्य सरकारने ठराव केला होता.

अखेर  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. आज दुपारी निवडणूक होऊ घातलेल्या नगरपालिका कार्यालयात प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले.
नशिराबाद नगरपंचायतीत ७ अ प्रभाग अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले असून अन्य १ ते १० अ सर्वसाधारण महिला तर १ ते १० ब सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याची माहिती नशिराबाद नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सोनवणे यांनी म्हटले आहे.

Protected Content