किरकोळ कारणावरून तरूणाला दोघांकडून बेदम मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बी.झेड. गल्लीत किरकोळ कारणावरून एका तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ करत डोक्यात सेंटींग काम करण्याची लाकडी फळी टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फहिम खान लियाकत खान वय-२९ रा. मुस्लिम कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भुसावळ शहरातील बी.झेड. गल्लीत फहिम खान हा शनिवारी २ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास काही मित्रांसोबत बसलेला असतांना मोहम्मद खान शकूर खान आणि इमरान खान मोहम्मद खान दोन्ही रा. भुसावळ हे तिथे आले व फहिम खान याला धक्का दिला. याचा जाब फहिमने दोघांना विचारला याचा राग आल्याने मोहम्मद खान शकूर खान आणि इमरान खान मोहम्मद खान यांनी फहिमला शिवीगाळ करत डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहम्मद खान शकूर खान आणि इमरान खान मोहम्मद खान या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ कांतीलाल केदारे हे करीत आहे.

Protected Content