अमळनेर येथे संत गजानन महाराज सेवा संस्था प्रकट दिवस उत्साहात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अमळनेर येथील जी.एम सोनार नगर मधील गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकट दिवस निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन परिवारातील अनेक भविकानी सहकार्य करीत यावेळी सुमारे चार हजार भाविकानी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री गजानन महाराजांचा सकाळी सहा वाजेला लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या 21व्या अध्यायाचे सामायिक वाचन व माळजप,बावन्नी,करण्यात आले. सबगव्हाण येथून विलास पाटील, संजय पाटील ,अरुण पाटील, नीता पाटील, संगीता पाटील यांनी पालखी वाजतगाजत आणली. अमळनेरला गजानन महाराज मंदिरात पालखीचे स्वागत व पूजन ज्योतीताई पवार व महीला भक्तांनी केले. अमळनेर तालुक्याचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील भामरे माजी नगरसेवक पांडुरंग महाजन ,बबली पाठक ,राहुल पाटील गलवाडे, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

यावेळी मंदिराच्या विकासासाठी व काही माझ्याकडून सहकार्य लागत असेल तर मी नेहमीच कटिबद्ध राहील. आपल्याला येणाऱ्या काळात संत गजानन महाराज मंदिरात तीन हाँल लागणार आहेत. मी त्यासाठी संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्ताने आपल्याला आश्वासन देत निश्चितच सहकार्य करेल असे सांगितले. त्यानंतर गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा आर.बी पवार ,महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी सत्कार केला. अमळनेर तालुक्यातील सुमारे चार हजार गजानन भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.. ‘गण गण गणात बोते’ नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी अमळनेर येथील गजानन महाराज मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.. शिस्तबद्ध पद्धतीने अनेक गजानन भक्तांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले..

कार्यक्रमासाठी यांनी केले सहकार्य
संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने ज्योती पवार, नितल पाटील, वंदनाताई भारती,शोभाताई कोळी,रेवा पाटील, सुनिता बागुल, बबीता पवार, वैशाली गोसावी, किर्ती शेलकर, ज्योती माळी, सुनिता खोंडे, छाया शिंगाने, चित्रा पाटील, विद्या पाटील, निशा पाटील, ज्योतीताई शर्मा, गुलाबराव पाटील, मनीष पाटील, मोहित पवार, चेतन उपासनी, सेवेकरी रघुनाथ पाटील, परेश पाटील, विजू येवले, ह.भ.प.पुंडलिक पाटील, सेवेकरी विश्वासराव पाटील, गुलाबराव पाटील, ह. भ. प. कपुरचंद महाराज करणखेडा, वानखेडे वायरमन, आर.टी.बागूल, सुनिल शिंगाणे, संजय पाटील, नितीन भावे, संजय साळुंखे, सुभाष पाटील, गोपाल पाटील, संजय पाटकरी, चेतन जाधव, मातोश्री टेन्टचे विनोद पाटील, पंकज येवले यांनी व गजानन महाराज परिवारातील बंधू भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Protected Content