दहीगाव येथे आषाढी एकादशीनिमित्ताने महाप्रसादाचे वाटप

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहीगाव येथील प्रति पंढरपूर मानले जात असलेल्या मंदिरात भव्य यात्रोत्सव भाविकांच्या आलोट गर्दीत पार पडला, यात विठू माऊलीचे हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ ही घेतला.

जळगाव व यावल तालुक्यातून दिंडी सोहळे ही आलेत. दिवसभर गाव हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले. येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आज आषाढी एकादशी रविवार दि. १० जुलै रोजी सकाळी पाच वाजता नऊ दापत्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्माई मूर्तींचे विधीवत पूजन करण्यात आले. दिवसभर मंदीर परिसरात भावगीते, भजन, अभंग सुरू होते. जळगाव तालुक्यातील वढोदे शिरसाड , साखळी, सावखेडा सीम, यावल येथील भाविकांनी दिंडी आणल्या होत्या. दिवसभर सततधार पाऊस असल्याने मंदिरातच त्यांनी भावगीते म्हटली आणि निरोप घेतला. भाविकांना दहा क्विंटल साबुदाण्याचा फराळ वाटप करण्यात आला. यावेळी शिवशंभू संघटनेमार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ५o रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्तम प्रतिसाद दिला. सायंकाळी पाच वाजता मंदिरा परिसरापासून भव्य असा दिंडी सोहळा काढण्यात आला. विविध धार्मिक पुस्तकांचे स्टॉल व पूजा आर्चेचे दुकाने थाटली होती. यात्रोत्सवात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शालीग्राम सर चौधरी, एम. आर. महाजन सर, आर. आर. चौधरी, एन. डी. पाटील, सागर चौधरी, वैभव पाटील, शुभम पाटील, वेदांत सूर्यवंशी, राज पाटील, कल्पेश पाटील, योगेश महाजन, बापू महाजन, निलेश धनगर, राहुल पाटील, पारस महाजन, हेमंत पाटील, उज्वल पाटील, किरण पाटील, भिकन पाटील, देवा झोपा पाटील, राजू महाजन, धोंडू पाटील, पिंटू पाटील, मधुकर पाटील, हरिभाऊ पाटील, कमलाकर पाटील, एन. के. पाटील, नितीन पाटील, एस. के. पाटील यांचे सह गावकऱ्यांनी सहकार्य केले. तर रक्तदान शिबिरासाठी कविता पाटील, दिव्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पाटील, मयूर पाटील, कोमल पाटील, शिव शंभू संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी कामकाज पहिले.

Protected Content