मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विटनेर गावाजवळ भरधाव मालवाहू गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत मोताळा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर मालवाहू गाडीतील तीन जण जखमी झाले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर गावापासून चार किलोमीटर अंतरावर नेरीकडून एरंडोलकडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी (जीजे ०५ बीटी ६४८९) ने जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच २८ डब्ल्यू ९४४०) ला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार साहेबराव चिमा शिंदे रा. चिंचखेडा ता. मोताळा जि. बुलढाणा हा तरूणाचा मृत्यू झाला. तर गाडीतील चालकासह इतर दोघे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. महिंद्रा पिकअप गाडी हा रस्त्याच्या चारीत पडली.

 

अपघात झाल्यानंतर विटनेरचे पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांच्यासह नागरीकांना घटनास्थळी धाव घेतली.   दरम्यान मयत तरूण हा कामानिमित्त साक्री (धुळे) येथील विजापूर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. काम आटोपून पुन्हा दुचाकीने चिंचखेडा ता.मोताळा येथे आपल्या गावी परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

 

Protected Content