मॅरेथॉन आजी लता करे यांच्या प्रमुख उपस्थितीत खामगावात ‘ग्रँड ग्रिनाथॉन’चे आयोजन

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मिशन ओ-टू तर्फे खामगावात रविवार दि. २४ जुलै रोजी आयोजित ‘ग्रँड ग्रिनाथॉन’ मॅरेथॉनमध्ये आजी लता करे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन चळवळीस गतीमान करण्यासाठी येत्या २४ जुलै ला खामगावात ‘ ग्रँड ग्रिनाथॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मिशन ओ-२ च्या पुढाकाराने ‘चला धावुया आणि झाडे लावुया!’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात येत आहे. हजारो तरुण- तरुणी संपूर्ण महाराष्ट्रातून खामगांवात येणार असून मिशन O2 फॉउंडेशन ने या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. खामगांव नजीक गारडगाव फाटा येथून सकाळी ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असून किन्ही महादेव फाटा येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे. ही स्पर्धा ६ किलोमीटर अंतराची असून त्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला जवळच असलेल्या टेकडीवर वृक्षरोपण करायचे आहे. स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना तीस हजारापर्यंतच्या रोख पारितोषिकांची लयलूट केल्या जाणार आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी आपल्या पतीच्या उपचारासाठी मॅरेथॉन स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकणाऱ्या सुप्रसिद्ध मॅरेथॉन आजी लता भगवान करे यांची उपस्थिती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेकाला टीशर्ट, ग्रीनेथोन मेडल, पेयजल, अल्पोपहार आणि ऊर्जापेय देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. आपले पर्यावरण टिकविण्यासाठी वृक्षरोपणाच्या साहाय्याने टेकड्या हिरव्या करण्यासाठी तसेच वृक्षलागवड गतीमान करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित केला असून, स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यात आले असून व रोपांची व्यवस्था किन्ही महादेव फाट्यावर करण्यात आली आहे. लागवड केलेल्या वृक्षांचे मिशन ओ-२ च्यावतीने संगोपन केले जाणार आहे. आत्तापर्यंत हजारो वृक्षांचे संवर्धन व संगोपन मिशन 02 करीत आहे.
या स्पर्धेत ऑनलाईन www.missionO2.in या वेबसाईट वर तसेच ऑफलाईन सुद्धा नाव नोंदणी करता येईल. नाव नोंदणीसाठी साई होमियो क्लिनिक, नॅशनल शाळेसमोर, खामगांव येथे करता येईल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ९००४७१७२७२, या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन ओ-२ च्यावतीने करण्यात आले आहे.

Protected Content