भुसावळात महास्वच्छता मोहीमेस प्रारंभ (व्हिडीओ)

c62998f6 e9b8 447f ac08 a651f3830019

भुसावळ (प्रतिनिधी) शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे सर्वत्र असलेली अस्वच्छता ही आहे. ती दूर करण्यासाठी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन एक व्यापक अशी महास्वच्छता मोहीम राबवण्यास प्रारंभ केला आहे.

 

शहरातील प्रत्येक वॉर्डातील रस्ते, गटारी, गल्लीबोळ, खुले मैदान अगदी प्रत्येक भाग हा स्वच्छ करणे, हा या मागचा हेतू असून जोपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ होत नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरू राहील, असे भोळे यांनी म्हटले आहे. या मोहिमेत अधिकारी व कर्मचारी मिळून ७५ जणांची टीम कार्यरत आहे. तसेच पाच ट्रॅक्टर, लोडर मशीन जेसीबीही मदतीला आहेत.

आज (दि.२०) सकाळी ८.०० वाजता जाम मोहल्ला या गजबजलेल्या भागातील शालिमार हॉटेल जवळून या मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्ष स्वत: हजर होते, मात्र प्रभागातील दोन्ही नगरसेवकांनी या वेळी दांडी मारली होती. या महास्वच्छता अभियानादरम्यान नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी विविध भागात जाऊन पाहणी केली. यावेळी जाममोहल्ला परिसरात संतप्त महिलांनी सफाईप्रश्‍नी मुख्याधिकारी दोरकुळकर यांना धारेवर धरले. या परिसरात नियमित साफसफाई होत नाही, त्यामुळे गटारी तुंबलेल्या आहेत. कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे नियमित सफाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

 

 

Protected Content