समाजकंटकांनी केली 16 ट्रकांची तोडफोड

crime 1

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी सेक्टरमध्ये उभे असलेले ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीच्या 16 ट्रकांच्या काचा रात्री अज्ञातांनी दगडांनी फोडून काढल्या. दरम्यान त्यांना चालकांनी हटकले असता त्यांच्यावर दगड उगारला तर एकला दगड फेकून जखमी केले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदिवण्याचे काम सुरू असून एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीतील सिंग ट्रान्सपोर्ट आणि रोहित रोडवेअर कंपनींच्या 14 ट्रका आणि जळगावातील अस्लम खान आणि अफसर खान यांच्या मालकीच्या दोन ट्रान्सपोर्ट करणारी ट्रेलर अश्या एकून 16 गाड्या एमआयडीसीतील ढोर बाजार जवळ जगवानी नगर येथे उभ्या केलेल्या होत्या. दरम्यान रात्री 11.30 वाजेच्या सुमारास अज्ञात 6 ते 7 समाजकंटकांनी ट्रकांवर दगडफेक करून काचा फोडल्या. अज्ञातांना ट्रक चालक मोहम्मद हारून मगर खॉ यांनी हटकले असता त्यातील एकाने दगड फिरकावला. यात चालक मोहम्मद हारून जखमी झाला.

अनेक ट्रकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
ट्रक क्रमांक (एचआर 38 एस 3741), (एचआर 38 एस 6606), एमएच 40 एन 7707, एमएच 36 एफ 1440, एमएच 30 एबी 699, एमएच 40 वाय 8725, एनएल 02 क्यू 0179, (एचआर 38 एस 0455), एनएल 01 एडी 680, एमएच 19 झेड 1776, एचआर 38 एस 9798, (एचआर 38 वाय 5156), यूपी 78 बीटी 2251, यूपी 78 बीटी 2711, एमएच 31 सीक्यू 5826 या गाड्यांचे नुकसान केले आहे.

एकाला चौकशीसाठी घेतले ताब्यात
रात्री 11 वाजता अज्ञातांनी दगडफेक केल्यानंतर अनेक ट्रकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. ज्यावेळी अज्ञातांना दगडफेक केली त्यावेळी एका ट्रक चालकाशी हातापाई झाली होती. दगडफेक झाल्यानंतर त्यानी घटनस्थळाहून पळ काढला. रात्री झालेला प्रकार चालकांनी एमआयडीसी पोलीसात जावून घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलीसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दुपारी उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content