जेवण करून फिरायला जाणे पडले महागात !

चाळीसगाव प्रतिनिधी । रात्रीचे भोजन केल्यानंतर घराला कुलूप लावून फिरायला गेलेल्या दाम्पत्याच्या घरातील कपाटातून एक लाख पासष्ट हजार लंपास केल्याची घटना शहरातील बाबाजी चौकाच्या पाठीमागे घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मदनसिंग बादलसिंग परमार (वय-६१ रा. जिजाऊ बंगला, जय बाबाजी चौक, ता. चाळीसगाव) येथे वास्तव्यास आहेत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराला कुलूप लावून ते पत्नीसह शहरातील हिरापूर रोडवर फिरायला गेले होते. ते घरी परत आले तेव्हा घरातील कपाटात २० ग्रॅमच्या दोन सोनेच्या बांगड्या, पन्नास हजार रुपये रोख व पाच हजार किंमतीचे सॅमसंग मोबाईल असे एकूण १,६५००० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ि

ही घटना दि. ३० मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. मदनसिंग परमार यांची बायपास सर्जरी झालेली असल्याने उशिराने त्यांनी दि.३१ रोजी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार सपोनि सैय्यद हे करीत आहेत.

Protected Content