नयना झोपे यांना समाजभूषण पुरस्कार

 

जळगाव : प्रतिनिधी । नवी दिल्ली येथील केंद्रीय मानवाधिकार संघटन यांच्याकडून डॉ नयना झोपे यांना जळगाव तालुका संघटक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद दहिवले यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

 

हा कार्यक्रम  जळगावच्या अजिंठा विश्रामगृह येथे पार पडला डॉ नयना झोपे ह्या महाजन झेरॉक्सचे प्रोप्रायटर नितीन महाजन यांच्या पत्नी आहेत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे यावेळी राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर , जिल्हाध्यक्ष डॉ  अजय पाटील,  जिल्हा उपाध्यक्ष साधना लोखंडे , जिल्हा सचिव प्रा राजकुमार कांकरिया , तालुकाध्यक्ष किशोर पाटील , उपाध्यक्ष ज्योती राणे , उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय भटकर , संघटक सचिव भागवत  राठोड , प्रतिभा खडके , पुष्पा पाटील , ज्योती गोसावी , डॉ तुळशीराम खडके उपस्थित होते

 

Protected Content