दादावादी येथे मोफत कोरोना तपासणी शिबीर

 

जळगाव : प्रतिनिधी । जनमत प्रतिष्ठान व दादावाडीच्या भक्तवत्सल श्रीराम नगर तरुण मित्र  मंडळाकडून विनामूल्य covid-19 तपासणी शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते

 

सुरुवातीला जि, प व कृषी उत्पन्न बाजार माजी सभापती स्व, बळीराम दादा सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर कार्यक्रमाचे  प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचे व शिबिराचे उद्घाटन करण्यात आले  सामाजिक कार्यकर्त्या व अध्यक्षा सरिता कोल्हे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला

यावेळी  शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या आपण ठामपणे सोडवू, या बाबतीत लोकांनी थोडे सहकार्य करून आपण एक चांगले व स्वच्छ शहर  घडवू शकतो असे  महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले

 

याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , ऑल इंडिया शाहू ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन सैंदाणे, कुंदन सूर्यवंशी, नगरसेवक चंद्रशेखर पाटील , वासुदेव पाटील , हर्षाली पाटील , ललित धांडे , महेश राठी , विजय लुल्ल्हे , इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे दिनेश तेजी, योगेश सपकाळे यांची उपस्थिती लाभली होती

 

Protected Content