भुसावळातील बाजारात विक्रेते व ग्राहकांना मास्कचे वाटप

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाची लक्षणे लक्षात घेता शहरातील बाजार विक्रेत व ग्राहकांना शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या वतीने मस्कचे वाटप करण्यात आले.

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता दैनंदिन भाजी बाजारात बरेच विक्रेते आणि ग्राहक हे कुठेच सोशल डिस्टंसिंग पाळत नाहीत तसेच प्रत्येकाने घराबाहेर पडतांना मास्क लावून बाहेर पडले पाहिजे. सर्वच भाजी विक्रेत्याने मास्क लावूनच तसेच हातमोजे हातात घालून भाजीपाला विक्री करणे व तराजू काटा, भाजीची घमेली व ग्राहकांचे हात सॅनिटाइज करणे गरजेचे असतांना बहुतांशी लोक नियमांचे पालन करीत नसल्याचे लक्षात आल्‍याने आज रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स तर्फे मातृभूमी चौक व टी.व्ही. टॉवर मैदानावरील बाजारातील ज्या विक्रेत्यांनी व ग्राहकांनी मास्क लावलेले नव्हते अशा नागरिकांना मास्क वाटप केले तसेच सॅनेटरायझरने हात व वजन काटे साफ केली. तसेच बाजार घेतांना सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे, अशाही सूचना केल्या. याप्रसंगी आयोजक तया उपाध्‍यक्ष सरफराज तडवी, अध्यक्ष उमेश नेमाडे, सचिव राजेंद्र यावलकर, गणेश फेगडे तुषार झांबरे, हर्षल वानखेडे रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content