धक्कादायक : गिरीश महाजनांच्या मतदार संघात सर्वाधिक कुपोषित बालकं

0iboxn61d8f5jti6mrrhtwxuq5mffrj4

 

जळगाव (प्रतिनिधी) माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी कुपोषणाच्या मुद्द्यावरून बुधवारी विधिमंडळात भाजप सरकारला घरचा आहेर दिला होता. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक कुपोषित बालकं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच विधासभा मतदार संघातच असल्याची धक्कादायक माहिती शासकीय आकडेवारी सांगतेय. तर अधिवेशनात आवाज उठविणाऱ्या नाथाभाऊंच्या मतदार संघात देखील कुपोषित बालकांचा आकडा चिंताजनक आहे.

 

सरकारी यंत्रणेतर्फे कुपोषण थांबविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु त्याचा प्रभावी उपयोग होत नसल्याने कुपोषीत बालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याची बाब निदर्शनास आल्याने ते रोखण्यासाठी सरकार पातळीवर अदिवासी भागात विविध योजना राबविण्यात आल्या. परंतू त्या कागदावर असून युती सरकारच्या काळातच सर्वाधिक कुपोषीत बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी विधीमंडळात करून सरकारच्या तोंडचे पाणी पळविले होते.

जिल्ह्यात आजही अतितिव्र कमी वजनाची ३ हजार ७४५ मुलांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सर्वसाधारण वजन असलेल्या श्रेणीतील २ लाख ५ हजार ९९२ मुलांची तर कमी वजनाची २६ हजार ७९५ मुलांची नोंद करण्यात आली. सर्वाधिक कुपोषित बालके जामनेर विभागात असल्याची माहिती पुढे आली आहे. तर भडगाव आणि भुसावळ पारोळा तालुक्यात एकही तीव्र कुपोषित बालक आढळून आलेला नाहीय. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. अंगणवाड्यांमध्ये आहार घेणाऱ्या व अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येणाऱ्या नोंदींच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कुपोषित बालके शून्य ते सहा या वयोगटातील आहेत.

 

तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची तालुका निहाय आकडेवारी

 

अमळनेर : तीव्र कुपोषित १७ , मध्यम कुपोषित : ११५

भडगाव : तीव्र कुपोषित ०० , मध्यम कुपोषित : ३९

भुसावळ : तीव्र कुपोषित ०० , मध्यम कुपोषित : ५६

बोदवड : तीव्र कुपोषित १५ , मध्यम कुपोषित : १३२

चाळीसगाव : तीव्र कुपोषित १९ , मध्यम कुपोषित : २९७

चोपडा : तीव्र कुपोषित २८, मध्यम कुपोषित : ११७

धरणगाव : तीव्र कुपोषित १७, मध्यम कुपोषित : १०७

एरंडोल : तीव्र कुपोषित १४ , मध्यम कुपोषित : ३२

जळगाव : तीव्र कुपोषित १३ , मध्यम कुपोषित : ५५

जामनेर : तीव्र कुपोषित ३२ , मध्यम कुपोषित : १४०

मुक्ताईनगर : तीव्र कुपोषित १८ , मध्यम कुपोषित : १४८

पाचोरा : तीव्र कुपोषित ०६ , मध्यम कुपोषित : १३४

पारोळा : तीव्र कुपोषित ०२ , मध्यम कुपोषित : ३७

रावेर : तीव्र कुपोषित १३ , मध्यम कुपोषित : ५९

यावल : तीव्र कुपोषित ०६ , मध्यम कुपोषित : ४७

 

एकूण : तीव्र कुपोषित २०० , मध्यम कुपोषित : १५१५

Protected Content